जनतेज न्युज

राज्य सरकारला शेतकरी पुत्रांच्या रक्ताचा नैवेद्य लागतो का – रविकांत तुपकर

प्रतिनिधी, बुलडाणा : आज पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी  येथील सूरज जाधव नावाच्या शेतकरी पुत्रांने स्वतःची व्हिडिओ चित्रफीत तयार करून आज महावितरणला कंटाळून आणि सरकारला कंटाळून आत्महत्या केली आहे.. ही आत्महत्या नाही तर सरकारने पाडलेला खून आहे.. मी पुन्हा शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला येणार नाही.. सरकार आम्हाला मदत करायला तयार नाही..ऊर्जा मंत्र्याला  थोडी तरी लाज वाटली पाहिजे.. लॉक डाउन काळात भरमसाट आश्‍वासने देऊन ठेवली तर अव्वाच्या सव्वा बिल तुम्ही शेतकऱ्याला देताय.. पठाणी वसुली सारखं काही इंग्रजांच्या काळात अशा पद्धतीने शेतकऱ्यां कडून वसुली करतात.. बिल भरल्यानंतर सुद्धा एखादे कनेक्शन कट करतात, त्या लोकांना विजेपासून वंचित ठेवतात..सगळ्या महाराष्ट्राला आत्महत्या एक चिंतन करायला लावणारी आहे..लाज वाटली पाहिजे सरकारला शुल्लक गोष्टीवरून अधिवेशन  बंद पडतात.. किती शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेणार आहे, या सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताचा नैवेद्य लागतो का?  सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?मी शेतकऱ्यांच्या पुत्रांना सांगतो की ,आत्महत्या करायची नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्याबरोबर खंबीरपणे उभी आहे. तुमच्यावर आलेली गोळी पहिली आमच्या छाती वर घेऊ पण आत्महत्या करू नका.