प्रतिनिधी, सांगली : प्रकाश हॉस्पिटल विरुद्ध गुन्ह्यातील फायली तपासल्या असता अनेक फाईल मध्ये तफावत असल्याचे आज इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये सांगितले.चव्हाण पुढे म्हणाले योगेश आनंदा खोत रा.ग्रामपंचायतजवळ पडवळवाडी ता. वाळवा जि. सांगली यांनी त्यांची मयत आई के. शांता आनंदा खोत वय ६५ वर्ष यांना कोरोना हा आजारावर औषधोपचाराकरीता प्रकाश हॉस्पीटल इस्लामपूर येथे अॅडमीट केले होते. आईचे उपचारापोटी वेळोवेळी २४,३९०/- रुपये पावती न देता बिल घेवून तसेच त्यांचेकडुन आईचे आधारकार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स घेवुन औषधोपचाराचा खर्च हा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतुन करुन घेवुन हॉस्पीटलमध्ये भरलेले नमुद बिल अगर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतुन माफ झालेली रक्कम परत न देता योगेश खोत यांची तसेच महाराष्ट्र शासनाची फसवणुक केली असल्याचे निष्पन्न झाल्याने योगेश खोत यांनी इस्लामपूर पोलीस ठाणेस फिर्याद दिली आहे . त्यावरून दि.०५फेब्रुवारी रोजी ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामपूर पोलीस सदर तपासादरम्यान हॉस्पीटल प्रशासनाने १९६ कोव्हीड रुग्णांचे उपचाराच्या केसपेपरच्या फाईल चौकशी कामी सादर केल्या आहेत. सदर फाईल व हॉस्पीटल प्रशासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना मध्ये शासनास सादर केलेल्या रुग्णांच्या उपचाराच्या फाईलमध्ये मोठ्याप्रमाणात तफावत व बनावटीकरण केले असल्याचे आढळुन आले आहे. काही रुग्ण हे हॉस्पीटलमधुन डिसचार्ज घेवून गेल्यानंतरही ते हॉस्पीटलमध्ये अॅडमीट असल्याचे दाखवणेत आले आहे. व त्याप्रमाणे त्यांच्यावर उपचार केले असल्याचे केसपेपर बनवण्यात आले आहेत व ते शासनाला योजनेचा फायदा मिळवण्याकरीता सादर केले आहेत. सदर कागदपत्रांमध्ये डॉक्टरांची नावे नंतर लिहणेत आलेली आहेत त्यामुळे खरोखर सदर डॉक्टरांनीच सदर रुग्णांवर उपचार केले किंवा कसे किंवा ते हजर असल्याचे बनावटपणे सांगुण त्यांची नावे नमुद केली आहेत किंवा कसे याबाबत तपास सुरु आहे. रुग्णांच्या केसपेपरमध्ये औषधांची नावे नंतर लिहणेत आली आहेत. कागदपत्रांमध्ये डॉक्टरांनी नमूद कलेले औषधोपचार व नर्सिंग नोटस व ड्रग चार्टमध्ये देण्यात आलेले औषये यात प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे त्यांना खरोखरच औषधे देण्यात आली किंवा कसे याबाबत तपास सुरु आहे. केसपेपरमध्ये रुग्णांच्या परिस्थीतीबाबत (टेंपरेयर, बीपी, ऑक्सीजन लेव्हल) या नोंदी रुग्ण डिसचार्ज झाल्यानंतर घेण्यात आलेल्या आहेत. दरवेळी रुग्ण तपासताना वेगवेगळ्या डॉक्टरांनी, तसेच औषधे दिल्यावर नसेंस यांनी नोंदी घेणे अपेक्षीत आहे परंतु हॉस्पीटलकडुन प्राप्त केसपेपरमध्ये रुग्ण अॅडमीट झाल्यापासून तो डिसचार्ज होईपर्यंत एकाच इसमाने सर्व नोटस लिहल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे त्याचेवर खरोखर उपचार झाल किंवा नाही याबाबत तपास सुरु आहे. योजनेकरीता दाखल केलेल्या कागदपत्रां मध्ये रुग्ण हा मरण पावला असल्याचे दिसत असुन हॉस्पीटलकडुन सादर करण्यात आलेल्या केसमध्ये तो उपचार घेवून बरा झाला असल्याचे व त्याला डिसचार्ज दिला असा आहे. काही रुग्णांचे उपचाराचे कागदपत्र हे पूर्णपणे वेगळे असल्याचे आढळून आले आहे. रुग्णांकडुन शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा मोठया प्रमाणात बिलाच्या रक्कमा रोख स्वरुपात स्वीकारल्या असल्याचे आढळून आले आहेत यामुळेच प्रकाश हॉस्पिटलच्या डॉकटर वर गुन्हा दखल केला असून वरीलबाबत कोणत्या रुग्णाची काही तक्रार असलेस इस्लामपूर पोलीस ठाणेस संपर्क साधन्याचे इस्लामपूर पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी आव्हान केले आहे.
