जनतेज न्युज

कोरोना महामारीमुळे यावर्षी गुन्हेगारीचे प्रमाण घटले – पोलीस आयुक्त निखील गुप्ता

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या पोलीस आयुक्तांच्या वतीने 2020 साली घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये आयुक्त निखील गुप्ता यांनी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे सांगितले. यावर्षी कोरोना असल्यामुळे आणि राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली. तसेच गुन्हेगारी संदर्भातील तपास करण्यासाठी वेळ मिळाला असल्याचे ही सांगितले. यावेळी पत्रकारांनी, “एका राजकीय व्यक्तीने बलात्काराच्या गुन्हा केला आहे मात्र पोलीस काहीच हालचाल करताना दिसत नाही” असा प्रश्न विचारल्यावर. निखील गुप्ता यांनी तपास पूर्ण चालू आहे आणि पूर्ण तपास झाल्याशिवाय माहिती देणे अयोग्य असल्याचे पत्रकारांना सांगितले.