जनतेज न्युज

एपीएमसी परिसरातील कचऱ्याच्या ढिगाखाली आढळलेल्या खुनाचा 24 तासात लावला छडा..

प्रतिनिधी , एपीएमसी : एपीएमसी सेक्टर 11 येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचा सांगडा आढळून आला होता,त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करून, या खुनाचा तपास पोलिसांनी अवघ्या 24 तासात लावला आहे.
127 डिसेंबरला एपीएमसी परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पुरुषाचा कुजलेला मृतदेह (सांगाडा) आढळून आला होता.या घटनेची एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.या प्रकरणी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले, पोलिसांनी जवळपास असणाऱ्या झोपडपट्टीमधील लोकांना विश्वासात घेतले, व अधिक चौकशीत पारू नावाची महिला झोपडी सोडून गेल्याची माहिती मिळाली.तिचा अनेक ठिकाणी शोध घेल्यावर अखेर ती सापडली.
पारू या महिलेचा मृत प्रवीण नायर(50) हा पहिला पती असल्याची माहिती मिळाली,त्याच्यापासून तिला 6 वर्षांची मुलगी आहे. तो नेहमी तिच्यासोबत भांडण करीत असे म्हणून तिने त्याला सोडले व तिचे प्रेमबहादूर सावन(49)याच्या सोबत प्रेमसंबंध जुळले.व ती त्याच्यासोबत राहू लागली या दोघांना 4 वर्षाचा मुलगा देखील आहे, पारू या महिलेचा पहिला पती व प्रियकर दोघेही परिचयातील असून, दोघे ती राहत असलेल्या ठिकाणी एकत्र दारू पिण्यास बसत असत, दिवाळी नंतर रात्री उशिरा पर्यत हे दोघेही घरी दारू पिण्यास बसले असता त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे प्रेम बहादूर याने प्रदीप नायर याला प्रचंड मारहाण केली व त्याचा खून केला, तसेच त्याला प्लास्टिकच्या बॅनर मध्ये लपेटून कचऱ्याच्या ढिगाखाली टाकले.व पारू हिला कोणालाही न सांगण्याची धमकी दिली व राहती झोपडी सोडून, दुसऱ्या ठिकाणी राहण्यास आला तो पळून जायच्या तयारीत असता एपीएमसी पोलिसांच्या विशेष पथकाने अवघ्या 24 तासात अटक केले.