प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद मधील झालेल्या बलात्कार प्रकरणी शहरातील बाबा पेट्रोल पंप येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतिने निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आरोपीला तात्काळ अटक करुन पिडेतेला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष मेहबूब शेख यांच नाव असल्याचे सांगितले जात आहे. परंतु गेल्या तीन दिवसापासून मेहबूब शेख यांची कोणतीही चौकशी करून त्यांना अटक झाली नसल्याचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री अंकिता पवार यांनी सांगितले.
