प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबादमध्ये तरुणीवर कारमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज वाशिममध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निदर्शनं करण्यात आली. राज्यात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा,राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला सरकारने वाचवण्याचा प्रयत्न चालवला असून ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून 3 महिन्यात या केसचा निकाल लावावा, अशी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केलेल्या घृणास्पद प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवला.
