जनतेज न्युज

गेवराईच्या तहसीलदारांवर तीन वेगवेगळ्या महिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

प्रतिनिधी, बीड : घरातील कोणाचिही परवानगी न घेता घरात घुसून महिलांना धमकवल्या प्रकरणी गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे यांच्या सह सात ते आठ अनोळखी व्यक्तींवर गेवराई पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन महिलांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दरम्यान तिनही फिर्यादी महिला गेवराईच्या समृद्धी नगर भागातील रहिवासी असुन त्यांच्या घरी विनापरवाना जाऊन तुम्ही वाळु प्रकरणातील आरोपी लपवुन ठेवले आहेत असे म्हणत धमकवल्याचे या महिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.मात्र अगोदरच गेवराई मधील अवैध वाळु उपशाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता वाळु चा वाद घरापर्यंत गेला असल्याचे दिसून येते.फिर्यादीत सांगितल्या प्रमाणे तहसीलदार सचिन खाडेंसोबत आणखी सहा ते सात लोक कोण होते ते पोलीस तपासात स्पष्ट होईल.तर या सर्व प्रकरणी आम्ही जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करणार असल्याचे सांगत महिलांवर अन्याय होत असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच मग तो कोणीही असो अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगिता चव्हाण यांनी दिली आहे.