प्रतिनिधी, नांदेड : शिवजयंतीच्या मुहूर्तावर महापालिकेच्यावतीने नियोजन भवन येथे माझे घर हरीत घर हा कार्यक्रम हाती घेतला होता नांदेड वाघाळा शहर महापालिका तसेच वृक्षमित्र फाउंडेशन च्या वतीने एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नांदेड शहरातील ज्या प्रेक्षकांनी आपल्या घराची राखण फळे-फुले आयुर्वेदिक वनस्पती तसेच कृत्रिम रित्या फळबागांची लागवड केली होती अशा 101 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महापौर यांची प्रतिक्रिया घेतली असता शिवजयंतीच्या मुहूर्तावर महापौर तक्रार निवारण कक्षा.. तक्रार तुमची साथ आमची हा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे 8888892062 ज्या नागरिकांना काही समस्या असेल तर या नंबर वरती व्हाट्सअप करून समस्या सांगाव्या व त्वरित सोडण्यात येतील व जास्तीत जास्त नागरिकांनी या कक्षेचा उपयोग करून घ्यावा असे देखील आव्हान नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री पावडे यांनी असे आव्हान केले आहे पालक मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील या उपक्रमाची प्रशंसा केली आहे
