जनतेज न्युज

पूजा करण्याच्या नावाने साडे पाच तोळे सोने लांबवणाऱ्या भोंदूना पोलिसांनी अटक केली

प्रतिनिधी, औरंगाबाद :  महिलेच्या फिर्यादीनुसार, महिलेचे सोन्याचे गंठण, नेकलेस आणि कानातले रिंग असे दागिने घेऊन उस्मानपुऱ्यातील आलिशान कॉम्प्लेक्स मधील एका दुकानात बोलावले होते. या ठिकाणी एक महिला आणि पुरुष दुकानात बसले होते. त्यांनी सोन्याचे दागिने आणले का असे विचारून सर्व दागिने एका कपड्यावर ठेवायचे सांगितले. त्यानंतर त्या कपड्याचे गाठोडे बांधून घरी जाऊन दुसर्‍या दिवशी उघडा असे या भोंदूनी महिलेला सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी उघडून बघितले असता त्यामध्ये गव्हाच्या पिठाचा गोळा असल्याचे दिसले. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळताच महिलेने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून उत्तर प्रदेश मधील दोघांना अटक केली आहे.