जनतेज न्युज

चैत्यभूमी पानगाव येथे संचारबंदी

प्रतिनिधी , लातुर : लातुर जिल्ह्यातल्या पानगाव आणि परिसरातल्या पाच गावांमध्ये संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत, 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर पर्यन्त हे संचारबंदी आदेश लागू असतील, जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी आदेश काढून आंबेडकरी अनुयायांना घरीच राहून बाबासाहेबाना वंदन करण्याचं आवाहन केले आहे. पानगाव इथं बाबासाहेब आंबेडकरांच मोठं स्मारक आहे, या स्मारकावर दरवर्षी 60 ते 70 हजार अनुयायी एकत्र येतात , कोविड-19 चा प्रसार होऊ नये यासाठी संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. पानगाव मध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.