प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंती निमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये जिल्हाभरातील मनसे सैनिक सहभागी झाले होते
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही एका दिवसाशी संबंधित नसून ते 365 दिवस साजरी झाली पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आपणही शिवजयंती साजरी करत असल्याचे यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी सांगितले. यावेळी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, जिल्हा उपाध्यक्ष दया मिस्त्री विनोद सांडव बाबल गावडे, आदी मोठ्या प्रमाणात मनसैनिक उपस्थित होते. यावेळी मिठाईचे वाटप करत रस्त्यावरील नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
