जनतेज न्युज

आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहीद दिन साजरा

प्रतिनिधी ,वर्धा : स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह,राजगुरु आणि सुखदेव यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा येतो. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यासाठी आज वर्ध्यातील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आम आदमी पार्टीच्या वतीने शहीद दिन साजरा करण्यात आला तसेच यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद घोषणा देण्यात आल्या. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख प्रमोद भोबले, प्रकाश डोडाणी, संदीप भगत, खालीद खान, जयसिंग, ममता कपूर, श्रद्धा तिवारी इत्यादी उपस्थित होते.