प्रतिनिधी , अमरावती : कोरोना काळात जीवाची पर्वा न करता 24 तास सेवा देणाऱ्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने तसेच इतर समस्यासाठी त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे धाव घेत आंदोलन केले,वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वेळवर वेतन मिळत नाही त्यामुळे 5 तारखेच्या आत वेतन मिळावे,सातव्या वेतन आयोगाचा प्रथम हप्ता देण्यात यावा, ही मागणी यावेळी करण्यात आली,कोरोना मध्ये सेवा देऊनही शासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला
