जनतेज न्युज

अन्याकारक शासन निर्णय त्वरित रद्द करावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना संपातसहभागी…

पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांना दिले निवेदन….
प्रतिनिधी , जळगाव : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात होणाऱ्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना पाचोरा तालुका संपात सहभागी असल्याचे निवेदनं पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांना दिले आहे.यावेळी उपस्थित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून या शासन निर्णयाचा निषेध केला
यावेळी सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सकाळी पाचोरा तहसीलदार कार्यालयात एकत्र येऊन काळी फित लावून राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 11 डिसेंबर 2020 राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द कारण्याबत काढलेला शासन निर्णय हा अतिशय अन्यायकारक असून या शासन निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत असून प्रत्येक शाळेत शिपाई असणे गरजेचे आहे असे मत यावेळी व्यक्त केले
यावेळी पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांना दिले निवेदनात म्हटले आहे की राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशत:/ पुर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदे रद्द करणारा शालेय विभागाचा 11 डिसेंबर 2020 चा शासन निर्णय हा त्वरीत रद्दबातल करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने संपात सहभागी असल्याचे निवेदनं दिले आहे.
यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष रामदास दाभाडे,सचिव जगन्नाथ निकम,सहसचिव धनराज सोनवणे,अजय शिनकर,बबनराव पाटील,श्रीकांत अहिरे,सागर अहिरे, संजय पाटील,विजय पाटील,जनार्दन माळी,विजय महाजन,सागर महाजन,नाना साळवे,चंद्रभान पाटील,पवन घोरपडे,सुनिल माळी,आंबाजी पाटील,आबा सोनवणे,कैलास राठोड,हिरालाल परदेशी,राजेंद्र मराठे,शकील खाटिक,संजय वाघ,धनराज धनगर,शिवराम पाटील,ईलियास मलिक ,पिंजारी एजाज खान,शेख सत्तार,जुम्माखान रंगरेज,राजाराम पाटील,लखन पाटील,नारायण पाटील,गुलाब पाटिल,संजय गायकवाड,बी.पी.पगार,सुनिल गुजर,रविद्र पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते