जनतेज न्युज

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे- एन.आर.एच.एमची मागणी…

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी …
प्रतिनिधी , बुलडाणा : कोरोना जागतिक महामारीत भारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेदिवस वाढत चालले असतांना त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागावर सुध्दा प्रचंड प्रमाणात ताण वाढला होता. अशा परिस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद बुलडाणा कडून कंत्राटी तात्पुरत्या स्वरुपात भरती करन घेतले होते, सर्व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कोवीड 19 रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर होऊन कार्य केलेय. त्यावेळेस कोरोना रुग्ण वाढत असताना गावातील लोकांनी व नातेवाईकांनी तुच्छ वागणूक दिली. अशा परिस्थितीत कर्तव्य बजावले.कोरोना काळातील कंत्राटी पध्दतीची नियुक्ती संपुष्टात येत असून आता त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आरोग्य विभागातील रिक्त पदी नेमणूक देऊन कायमस्वरुती रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी या प्रमुख मागण्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना निवेदन देण्यात आले यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील कोवीड कक्षात काम करणाऱ्या परिचारिका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते….