प्रतिनिधी , जालना : सध्या जिल्ह्या-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींचं वारं वाहायला सुरुवात झालीय.जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील ज्या गावच्या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होईल,त्या गावांच्या विकासासाठी २० लाख रुपये देण्यात येईल,अशी घोषणा बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी केलीय.स्थानिक विकास निधीतून ही रक्कम दिल्या जाईल अशी माहितीही कुचे यांनी दिलीय.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संबंधित ग्रामपंचायतींची घोषणा करून आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित गावात विकास कामं सुरु केल्या जाईल असंही कुचे यांनी म्हटलंय.
