जनतेज न्युज

शाळेतील चतुर्थ श्रेणी शिपाई भत्ता कंत्राटी नियुक्ती निर्णय परत घ्यावा अन्यथा राज्यात शाळा बंद आंदोलन.

प्रतिनिधी , नागपूर : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी पुर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे प्रतिशाळा पाच हजार रुपये मानधन देण्याचा राज्यशासनाच्या 11 डिसेंबर 2020 चा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने नागपुरातील शिक्षक उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजप शिक्षक आघाडी विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांनी महाविकास आघाडी वर आरोप लावत म्हंटल की महाविकास आघाडी सरकार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना बेरोजगार करण्याचं षड्यंत्र रचत आहे. शासनाने निर्णय परत घ्यावा अन्यथा राज्यात शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.