प्रतिनिधी , ग्रामीण भागात संभाजी ब्रिगेड ची ताकद मजबूत आहे. परिवर्तन चळवळीच्या माध्यमातून पुरोगामी विचारधारा सांगत गावगाड्यातील प्रत्येक कार्यकर्ता संभाजी ब्रिगेडने बांधला आहे. वेगवेगळ्या पक्षीय राजकारणामुळे मोठ्या निवडणूकीत कार्यकर्ते विभागले जातात, मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत असं होत नाही. गावचा विकास, सामान्य लोकांचे प्रश्न, रस्ते, वीज, शिक्षण (शाळा) अन्नधान्य वितरण व इतर गोष्टीला सोबत घेउन गावचा विकास करणारा असेल आणि जो विकासाभिमुख राजकारण करू शकतो त्याच्या हातात सूत्र दिली जातात. *संभाजी ब्रिगेड नेहमी तरुणांसाठी राजकारण करत आलेली आहे. १००% समाजकारण आणि १००% राजकारण हे ब्रिद घेऊन ‘समृद्ध महाराष्ट्र’ घडवण्यासाठी भविष्यातील राजकारणामध्ये संभाजी ब्रिगेडचा फार मोठा वाटा असेल.मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड’ने 385 जागांवर यश यश मिळवले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी एक हाती संभाजी ब्रिगेडची सत्ता आहे, त्याठिकाणी संभाजी ब्रिगेडने चांगल्या पद्धतीने गावचा विकास करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठ्या निवडणुका अर्थात लोकसभा-विधानसभा यामध्ये आम्ही नवखे असल्यामुळे आम्हाला समाधानकारक यश मिळवता आलेलं नाही. गाव गाड्याचा अभ्यास संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्याला चांगला माहिती आहे. त्यामुळे अजून जोमाने काम करून महाराष्ट्राच्या भविष्यासाठी व गावाच्या विकासासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील सर्व 14,234 ग्रामपंचायत निवडणुका लढवणार
