जनतेज न्युज

ड्रायविंगचा आनंद घेण्यासाठी गाड्या चोरणाऱ्या अल्पवयीन मुलांना सोलापूर पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी , सोलापूर : मौजमजा करत दुचाकी चालवण्याचा आनंद लुटण्यासाठी मार्केटमध्ये लावलेल्या मोपेड गाड्या चोरणाऱ्या 14 आणि 12 वर्षाच्या दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून 2 लाख 10 हजार किमतीच्या 10 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे गाडी विकत घेणं शक्य नसल्याने ही मुलं स्वतःची हौस भागवण्यासाठी या गाड्या चोरत होते, दरम्यान गाडीतील पेट्रोल संपल्यानंतर तेथेच गाडी सोडून ही मुलं जायची अशी कबुली या मुलांनी सोलापूर पोलिसांकडे दिलेली आहे.