प्रतिनिधि , मुंबई : शिवसेना नेत्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मुंबईमध्ये तीन कोटी ७५ लाख रुपयांचं ऑफिस खरेदी केलं आहे. आज सकाळ पासुन या बातमीची सगळ्यास्तरावर चर्चा होत आहे. उर्मिलाने खार वेस्ट येथे लिंकिंग रोडवर आपलं नवीन ऑफिस विकत घेतलं आहे. यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी तीन कोटींपेक्षा जास्त किंमतीमध्ये ऑफिस विकत घेतल्याचं समजल्यानंतर कंगनानं निशाना साधला आहे. कंगना राणावतने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, भाजपाला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे. उर्मिलाजी मी स्वत:च्या मेहनतीनं घर विकत घेतलं होतं. पण काँग्रेस ते तोडत आहे. भाजपाला खूश करुन माझ्या हातात फक्त २५-३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रसला खूश केलं असते. या कंगनाच्या ट्विटला उर्मिला मातोंडकरने अनोख्या प्रकारे उत्तर दिले आहे. प्रिय कंगनाजी, माझ्या बाबतचे तुमचे सर्व विचार मी ऐकले, मीच काय संपूर्ण देशानं ऐकले आहेत. संपूर्ण देशासमोर सांगतेय की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा..
