जनतेज न्युज

उर्मिला मातोंडकरने मुंबईत ३ कोटी ७५ लाख रुपयांचं खरेदी केलं ऑफिस

प्रतिनिधी , मुंबई : नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मुंबईमध्ये तीन कोटी ७५ लाख रुपयांचं ऑफिस खरेदी केलं आहे. आज सकाळ पासुन या बातमीची सगळ्यास्तरावर चर्चा होत आहे. उर्मिलाने खार वेस्ट येथे लिंकिंग रोडवर आपलं नवीन ऑफिस विकत घेतलं आहे. हे नवीन ऑफिस १००० स्क्वेअर फूटमध्ये विस्तारलेलं आहे. सकाळपासून प्रसारमाध्यामात होत असलेल्या चर्चांवर उर्मिला मातोंडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी ऑफिस घेतलं हे खरं आहे. मात्र प्रसारमाध्यमांनी फक्त अर्ध सत्य छापलं. मार्च २०२० मध्ये अंधेरी डी.एन. नगर येथे असणारा माझा एक फ्लॅट मी विकला होता. या पैशातून मला खरेदी करायची होती. मात्र लॉकडाउनमुळे सर्व नियोजनावर पाणी फिरलं. आता त्याच पैशांमधून नवीन कार्यालय विकत घेतलं आहे. सर्व कागदपत्रं त्याच रजिस्टेन कार्यालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी बातम्या देताना व्यवस्थित द्याव्यात. आतापर्यंत प्रत्येक व्यवहाराचे सर्व कागदपत्रं आणि पुरावे आहेत मला तोडण्याचा प्रयत्न करु नका. असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून स्पष्टीकरण दिलं आहे.