जनतेज न्युज

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बीडमध्ये अनोखं आंदोलन..!

प्रतिनिधी , मोदी सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात ,दिल्ली येथे शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू केलेलं आहे.या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ, बीडमध्ये अखिल भारतीय परिवार पार्टीच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं.यावेळी आंदोलनकर्त्यांनी तिरंगा झेंडा मार्च काढत, सर्वसामान्य नागरिकांना, दुकानदारांना तिरंगा झेंड्याचे वाटप केलं. दरम्यान बीडमधील या अनोख्या आंदोलनांने नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं होतं..!