जनतेज न्युज

वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल यशोमती ठाकूरांची स्पष्टोक्ती राजकारण होत असल्याचा आरोप

प्रतिनिधी , अमरावती येथील मंजूर असलेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्गला हलवलं असा आरोप करण्यात आला होता, यात भाजपसह बीएसपीने महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, यावर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर आज अमरावतीत बोलतांना स्पष्टीकरण देत विरोधकांचा समाचार घेतला व या मुद्द्यावर राजकारण होत असून विरोधकांनी मागच्या पाच वर्षात काय केलं याचा हिशोब त्यांनी द्यावा असा घणाघात त्यांनी केला तर सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय हलवलं नाही, कोरोनामूळे ही प्रक्रिया रखडली होती,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काल बैठक झाली,सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय हलवले नाही, तर रेंगाळलेला गोष्टी लवकरच पूर्ण होईल असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त करत यावर होतं असलेल्या चर्चेवर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला