जनतेज न्युज

मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देणार-डॉ.नितीन राऊत

प्रतिनिधी ,मुंबई दि.७- आज मुंबईत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी काही निर्णयांची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी त्यांनी महाराष्ट्रात,कुसुम योजना राबवणार असल्याची माहिती दिली.

याचसोबत ३०० मेगावोट सौर ऊर्जा प्रकल्प देखील राज्यात राबवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.या योजनेसाठी टास्क फोर्स तयार केली जाणार आहे.

शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी मिळत असलेल्या वीजेसंदर्भातही त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.आता शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देणार असल्याची घोषणा यावेळी डॉ.नितीन राऊत यांनी केली आहे.