प्रतिनिधि , नंदुरबार : केंद्रातील मोदी सरकारने केलेले तिनही काळे कायदे शेतकरी विरोधी असून ते त्वरित रद्द करण्यात यावे, यासाठी संपूर्ण देशभर या कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या वनवा पेटला आहे. देशातील लाखो शेतकरी दिल्ली सीमेवर ठाण मांडून जीवाची बाजी लावत लढत आहेत. आतापर्यंत कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देशातील ५०० संघटना मिळून किसान संयुक्त मोर्चा स्थापन करून हे आंदोलन करीत आहे. तरी देखील केंद्रातील मोदी सरकारने हे कायदे रद्द केले नाहीत. उलट सर्वोच्च न्यायालयामार्फत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे तिनही काळे कायदे रद्द करण्याऐवजी या कायद्यांना स्थागिति दिली आहे. हे कृषी कायदे भाजपच्या धोरणांचे समर्थक आहेत. यासाठी एक समिती गठीत करून देशातील बडे उद्योगपती व कार्पोरेट कंपनीचे काम सोपे करीत आहेत.
केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात आज नंदुरबार शहरात कायद्याच्या प्रतींची होळी करण्यात आली. यावेळी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, किसान युनियन सभा, कामगार युनियन संघटना, वंचित बहुजन आघाडी व विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. जो पर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाही तो पर्यंत अशाच प्रकारे आंदोलन सुरू राहणार असे या संघटना मार्फत सांगण्यात आले आहे.
