जनतेज न्युज

पदवीधर निवडणूक ही राजकीय पक्ष आणि साखर कारखानदारांनी हायजॅक केली..

प्रतिनिधी , सांगली : पदवीधर निवडणूक ही राजकीय पक्ष आणि साखर कारखानदारांनी हायजॅक केली आहे.. तर सफाई कामगार यांच्या साठी कोणीच बोलत नाहीत.. त्यामुळे सफाई कामगार त्यांची मुलं यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार घालावा.. असे वक्तव्य संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केले…
या पूर्वी पदवीधर मधून निवडून आलेल्या आमदारांनी पदवीधरासाठी काय केलं..तसेच सफाई कामगार पदवीधरासाठी काय ही केलं नाही, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कोणी केली नाही.. या पुणे पदवीधर मतदारसंघात, सफाई कामगारांची संख्या 39 हजार 788 इतकी आहे.. तर पुणे पदवीधर मतदारसंघात सफाई कामगार व त्यांचे पदवीधर मुलं अशी मिळून 21 हजार 487 इतकी संख्या आहे..
शिवाय मागासवर्गीय बांधवा साठी असणाऱ्या महामंडळांना कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही, आत्ताच्या आणि पूर्वीच्या दोन्ही शासनाने मागासवर्गीय आणि त्याच पद्धतीने सफाई कामगारांच्या साठी कोणतीही काम केलं केलेली नाहीत.. त्यामुळे सफाई कामगार त्यांची मुलं यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार घालावा.. संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी आव्हान केले आहे..