प्रतिनिधी , नागपूर : पदवीधर निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार संदीप जोशी म्हणाले की निवडणुकीत प्रचार हा शेवटचा टप्यात आला आहे आणि हे माघील 58 वर्षाचा नागपूर पदवीधर हा भाजपाचा गड आहे आणि आता त्याची उम्मेदवारी पक्षांकडून मला देण्यात आली आहे. मतदार यादी बदली असली तरी विरोधकांना याचा फायदा होणार नाही कारण कि हि निवडणूक संगठन व कार्यकर्ता यांचा शक्ती वरच जिंकल्या जाऊ शकते. विरोधक माझा वर किती हि आरोप करतील पण मी प्रचाराची पातळी सोडणार नाही.
