भाजप च्या एकाही नेत्यांची चौकशी का नाही
प्रतिनिधी , अमरावती : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस त्यांच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाहीची आणि घटनेची पायमल्ली करत आहे अशि टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती येथे केली. भाजपच्या काही लोकांनी कित्येक मोठी संपत्ती जमा केली त्यांच्या एकाही भाजपच्या नेत्या वर ईडी ची चौकशी का लागत नाही? याआधी राज ठाकरे यांच्यावर चौकशी लागली शरद पवारांवर चौकशी लागली आता प्रताप सरनाईक यांच्यावर चौकशी लागली मग रावसाहेब दानवे का शुद्ध घी चे आहेत का असा संतप्त सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला
