जनतेज न्युज

पुणे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी रमेश खामकर यांच्या विरूद्ध ॲट्रोसिटी सह खंडणीचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी, पुणे : पुणे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी श्री. रमेश वि. खामकर यांनी मनपा एलबीटी कार्यालयाजवळील गटई कामगार सुनिल चऱ्हाटे यांना मागील सहा महिन्यांपासून दरमहा दोन हजार रुपये दे नाही तर अतिक्रमण विभागाला बोलावून तुझ्याविरूद्ध कारवाई करेन अशी धमकी देत होते, तसेच एलबीटी कार्यालयात जाता येता ए चांभारा तुझ्या चांभारी कामाची पेटी पुढे पुढे आणत आहेस, जागा तुझ्या बापाची आहे काय रे अशी सतत जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याने अखेर आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरूद्ध खंडणी व ॲट्रोसिटी खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत फिर्यादी सुनिल रूपचंद चऱ्हाटे हे पुणे महापालिकेच्या लगत असलेल्या एलबीटी कार्यालयाजवळ मागील 10/15 वर्षांपासून गटई काम करीत आहेत. ते मागील पाच सहा महिन्यांपासून श्री. रमेश वि. खामकर यांचा छळ करीत होते. अखेर त्यांनी चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. संजुभाऊ बनसोड यांना हकीकत कळविलेनंतर, चर्मकार विकास संघ व पुणे क्राईम न्यूज या मिडीया प्रकाशनाने पुढे येऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली. तसेच याबाबतचे सर्व पुरावे सादर करण्यात आले.

अखेर आज बुधवार दि. 6 जुलै 2022 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी गुन्हा रजिस्टर क्र. 101/2022 नुसार भा.द.वि 385, 504 सह अनुसूचिज जाती जमाती प्रतिबंध अधिनियम 1989 च सुधारित आवृत्ती 2015 चे कलम 3 (1) (आर) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान रमेश खामकर हे पुणे महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असले तरी, ते पुणे महापालिकेत माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून मिरवित असतात. तसेच वेगवेगळ्या खात्यात माहिती अधिकार अर्ज देवून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बेछूट आरोप करीत असल्याचे समोर आले आहे. श्री. खामकर यांनी पुणे महापालिका आयुक्त कार्यालय व शहर अभियंता कार्यालयाकडे पाठविलेल्या तक्रार अर्ज व ई मेल मध्ये जातीयवादी स्वरूपाची भाषा वापरण्यात आली असल्याचे आढळुन आले आहे. एखादया कर्मचाऱ्याने माहिती देण्यास विलंब केल्यास, त्याच्या विरूद्ध कसा वडारा सारखा बसतो, कसा मांगा सारखा बघतोय, अर्धवट काम करून पुणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी हे न्हाव्यासारखी अर्धवट दाढी केल्यासारखे काम करीत असतात अशा प्रकारची अत्यंत हीन दर्जाची भाषेचा वापर लेखी स्वरूपात केला असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा पाठपुरावा चर्मकार विकास संघ व पुणे क्राईम न्यूज करीत आहे.