जनतेज न्युज

जुन्या पुणे शहरातील अनाधिकृत बांधकामाच्या जंगलराजवर कारवाईचा बडगा

प्रतिनिधी, पुणे : जुन्या पुणे शहरातील सर्व पेठांमध्ये मागील तीन चार वर्षांपासून जंगलराज सुरू होते. सर्वच प्रकारच्या अनाधिकृत बांधकामांना पैसे घेऊन अभय देण्याचे तसेच नोटीसा देण्यासाठी व न्यायालयात जाऊन स्टे घेणेसाठी मालक, विकसक ऑक्युपायर यांचेकडून देखील पैसे घेवून गैरकृत्य केल्याप्रकरणी रामचंद्र सोपान शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान मागील पाच सहा महिन्यांपासून पुणे महापालिकेतील बांधकाम विकास विभाग झोन क्र. 7 चा पूर्णपदभार श्री. प्रविण शेंडे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जुन्या पेठांमधील जंगलराज संपुष्टात आणण्याचे शिवधनुष्य पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत कार्यकारी अभियंता श्री. प्रविण शेंडे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता ते म्हणाले की, पुणे शहरातील सर्व पेठांमध्ये सुरू असलेल्या अनाधिकृत बांधकामाविरूद्ध तीव्र स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे. तसेच ऑनगोईंग बांधकामांना तातडीने नोटीसा देवून सातत्याने कारवाई केली जात असल्याची माहिती दिली आहे. तसेच मागील काळात ज्या कामांना चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवानगी दिली असेल तर त्याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे.

बांधकाम विभागाकडून बांधकाम व्यावसायिक व जागा मालकांना आवाहन-

पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रविण शेंडे यांनी आवाहन केले आहे की, बांधकाम व्यावसायिक व जागा मालक, विकसक यांनी पुणे महापालिकेची रितसर परवानगी घेवून बांधकाम करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तसेच नवीन डीसी रूल नुसार 2020 नुसार मालक व भाडेकरू यांना दिलासा देण्यात आलेला आहे. भाडेकरूंचे 100 स्व्के फुटाचे क्षेत्रफळ असल्यास त्यांना 300 स्व्के फुटाची कमीत कमी व जास्तीत जास्त 500 स्व्के.फु. पर्यंत सदनिका मिळण्याचा हक्क मिळाला आहे. तसेच डीपी मध्ये प्रस्तावित रस्ता रूंदी क्षेत्र असल्यास ती जागा सोडून बांधकाम करण्यास परवागी देण्यात येत आहे. तसेच ज्या बांधकामांना एफएसआय घ्यायचा आहे त्यांनी तो घ्यावा किंवा पुढे त्यांना त्याचा टीडीआर देण्यात येत आहे. त्यामुळे नव्या नियमावलीनुसार शासनाने व पुणे महापालिकेने सवलती दिल्या आहेत. नागरीक, बांधकाम व्यावसायिक, जागा मालक, विकसक यांनी पुणे महापालिकेची मान्यता घेवूनच बांधकामे करण्याचे आवाहन श्री. शेंडे यांनी केले आहे.