जनतेज न्युज

प्रशासकीय इमारतीतून चोरी झालेला गुटखा जप्त… तीन आरोपी अटक…

गितेंनी पदभार घेताच धडाकेबाज करावाही…
प्रतिनिधी , बुलडाणा: अन्न व औषध विभागाने कारवाईत जप्त केलेला गुटखा शासकीय गोडाऊन मधून 10 डिसेंबर व 11डिसेंबर 2019 रोजी चोरी झाला होता. तर या घटनेमुळे अन्न व औषध प्रशासन आयुक्त राठोड यांना निलंबित देखील करण्यात होते. या गुटखा चोरीच्या प्रकरणातील सुगावा मिळताच तीन आरोपी आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मात्र नविन जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार अरविंद चावरिया आणि स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार बळीराम गितेंनी घेताच धडाकेबाज कारवाहीला सुरवात केलीय.यामुळे गुटखा माफियांचे धाबे चांगलेच दनाणले आहे..
प्रशासकीय इमारती मधील अन्न व औषध विभागाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या गोडाऊन मध्ये पोलिसांनी जप्त केलेला गुटखा दहा डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने गोडाऊन चे कुलूप तोडून गुटखा चोरीची घटना घडली होती,या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसात विविध गुन्हे दाखल आहे.या गुन्ह्यातील आरोपींचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.तर 24 वर्षीय मोहम्मद तौफिक मोहम्मद रफिक, 19 वर्षीय अक्षय अवसरमोल या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असुन सय्यद समीर सय्यद जहिर ,शेख बिलाल शेख रब्बानी ,विशाल दांडगे आणि काला आसिफ या साथीदारांना सोबत घेऊन चोरी केल्याचे कबूल केले आहे.या कारवाहीत 2लाख 34हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा तसेच एक पिकअप वाहन व एक मोटार सायकल अंदाजीत किंमत 3लाख 50हजार रुपये असा एकुण 5लाख 84हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मात्र अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.शिंगणे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले असतांना सद्धा त्यावेळच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी करावाही केली नसल्यामुळे नविन जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार अरविंद चावरिया आणि स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार बळीराम गितेंनी घेताच धडाकेबाज कारवाहीला सुरवात केलीय.यामुळे गुटखा माफियांचे धाबे चांगलेच दनाणले आहे..