जनतेज न्युज

लव्ह जिहाद कायद्याला भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांचा विरोध

प्रतिनिधी , लव जिहाद चा कायदा महाराष्ट्रात व्हावा अशी मागणी भाजप कडून होत असताना यावर बोलताना भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले मुले सज्ञान झाल्यानंतर कोणी कोणाशी लग्न करायचं ही कायद्यात तरतूद असून कायदा मोडून कोणी केराची टोपली दाखवू नये. वेगवेगळ्या राज्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे. काही ठिकाणी जाणून बुजून हे सर्व घडवून आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला
कोरोनाची दुसरी लाट दिल्ली पाठोपाठ राज्यातही येण्याची शक्यता असल्याने लॉकडाउनची गरज भासू शकते असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणतात मात्र दुसऱ्या बाजूला शाळा सुरु केल्या जात आहेत याबाबत बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सरकारचं याबाबत कोणतंही नियोजन नाही. निर्बंध लावणार असाल तर शाळा का चालू केल्या असा सवाल आ. शिवेंद्रराजेंनी ठाकरे सरकारला विचारला आहे