जनतेज न्युज

फिफा फुटबॉल वर्ल्ड कपच्या नावावर केली फसवणूक.

प्रतिनिधि , आपल्या राज्यात ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांचे डोळे काही केल्या उघडत नसल्याचंच चित्र बघायला मिळत आहे. कमी वेळेत जास्तीतजास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी अनेक जण आपली कष्ठाची कमाई गमावून बसले असताना देखील असले प्रकार घडत आहे, अशीच एक घटना नागपूरात सुद्धा घडली आहे. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप साठी कोट्यवधी रुपयांचे प्लायवूड लागणार असल्याने त्याकरिता टेंडर भरण्यासाठी दोन लाख ६५ हजार रुपये भरावे लागतील अश्या आशयाचा मेल नागपूरचे व्यापारी प्रशांत नायडू यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कोणतीही शहानिशा न करता थेट रक्कम दिलेल्या खात्यात जमा केली,त्यानंतर मात्र पुन्हा पैश्याची मागणी झाल्यानंतर नायडू यांना संशय आल्यानंतर त्यांनी या संदर्भात चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे,त्यानंतर त्यांनी थेट सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे,त्यानुसार पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे..