प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंबाळा येथे एक ज्वेलरी दुकान व टायरचे दुकानाचे शटर कुलूप तोडून साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आला होता, त्यामुळे ही चोरी उघडकीस करण्याचे आव्हान अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांना होते दरम्यान पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत या घटनेचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणला यामध्ये ही टोळी सशस्त्र आंतरराज्य गुन्हेगारी टोळी असून यातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली,यातील एक महाराष्ट्र राज्यातील व चार मध्यप्रदेश येथील आरोपी आहेत ग्रामीण पोलिसांना हे मोठे यश मिळाले आहे,यात पोलिसांनी आरोपी कडून दोन देशी कट्टे, दुकानातून चोरून नेलेले चांदीचे दागिने देखील पोलिसांनी जप्त केले आहे, यात देशी कट्टे, जिवंत काळातूस चारचाकी गाडी, चांदीचे दागिने सह 12 लाख83 हजारांचा मुद्देमाल जप्त केला
