जनतेज न्युज

अभिजित बिचुकले मातोश्री समोर करणार बेमुदत आंदोलन.

प्रतिनिधी , मुंबई : कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात यावी. असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या पत्राचा मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर विचार नाही केला तर 20 जानेवारी पासून मातोश्री समोर बेमुदत आंदोलन करणार आहे. गेली 35 वर्ष झाली मुंबई शिवसेनेची आहे. आजपर्यंत मुंबईकरानी तुमच्यावर भरभरून प्रेम केले आहे. म्हणून तुम्ही मुंबईकरांनवर दया दाखवावी आणि घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी.