प्रतिनिधी , मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणूकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होण्यास हरकरत नाही, असं संजय राऊत बिहार निवडणुकांबाबत बोलताना म्हणाले. सर्व निवडणुकीत तेजस्वीचा चेहरा राष्ट्रीय राजकारणात समोर आला. कुणाचाही सपोर्ट नसताना अशा प्रतिकूल परिस्थितीत एकटा लढतोय. मुख्यमंत्री तीनदा राहूनही त्यांची पार्टी तीन नंबरवर जात असेल तर विचार करण्याची वेळ आलीय. सरकार फेल गेलीय, हेच समोर आलं आहे. नितीशबाबूंनी सेनेला धन्यवाद दिले पाहिजे. भाजप आता मित्रांना व्यवस्थित वागवतंय. आता देवेंद्र फडणवीस हे बिहारचे प्रमुख होते. त्यांचे अभिनंदन नक्कीच पण तेजस्वीनं सर्वांना कामाला लावले, सर्वांना फेस आणला. सुशांत सिंह प्रकरणाचा फायदा झाल्याचे दिसत नाही. मतमोजणी प्रक्रिया खूप हळू चालली आहे. काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर आतापर्यंत तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते.अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषदेत दिली.
