जनतेज न्युज

बीडमध्ये वाळू माफियाची गुंडगिरी ; संतप्त शेतकऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न..!

प्रतिनिधी , बीड : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाळूमाफियांची गुंडगिरी वाढत असल्याचे प्रकार समोर येत असतानाच , आज पुन्हा एक ,वाळू माफियाच्या गुंडगिरीचा व्हिडिओ बीडमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालाय.ज्या व्हिडिओत , शेतकरी पिकांच्या नुकसानी बाबत वाळू माफियाला जाब विचारत आहे.’ तू इथंच थांब…तुला जाऊ देणार नाही… तहसीलदाराची गाडी येई पर्यंत थांब…असं म्हणणाऱ्या शेतकऱ्याला बाजूला करत चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार व्हिडिओत कैद आहे.हा व्हिडिओ बीड तालुक्यातील पारगाव सिरस या गावाच्या सिंदफणा नदीलगतचा असल्याचं बोललं जात आहे.