प्रतिनिधी , कोल्हापूर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल कोरोना संदर्भातील खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्याचं तंतोतंत पालन कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असून सर्व खबरदारीच्या उपाययोजना राज्य सरकार घेत आहे अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे। ते कोल्हापुरात बोलत होते
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून तालुक्यात कोरोना केंद्र पुन्हा एकदा उभारणी करण्याचं सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जिल्ह्यात फार कठीण परिस्थिती नसल्याने लॉक डाऊन चा कोणताही निर्णय तूर्तास चर्चेला नसल्याचं त्यांनी सांगितल आहे. तसेच महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक प्रशासन कोगनोळी टोल नाक्यावर आडवत आहे. याबाबत बोलताना राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले बेळगावच्या पालकमंत्र्यांशी आम्ही चर्चा करत असून यातून निश्चितच मार्ग काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे
