धुळे-: शिरपूर तालुक्यातील सावेर शिवारामध्ये एका शेतात असलेल्या झोपडीमध्ये अवैधरित्या दारू बनविली जात असल्याची माहिती थाळनेर पोलिसांना गुप्त माहिती दाराकडून मिळाल्यानंतर थाळनेर पोलिसांनी एक पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी अवैधपणे दारू बनविण्याचे काम सुरू असल्याचे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या असून या कारवाई दरम्यान पोलिसांनी नामांकित कंपनीच्या दारूच्या बाटल्यांनी भरलेले 25 खोके व दोन चार चाकी वाहन असा तब्बल सात लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाई थाळनेर पोलीस करीत आहेत.
