नांदेड . दिनांक. मुखेड तालुक्यातील पुनर्वसन व संपादित जमिनीचा मोबदला देण्यासाठी न्यायालयीन आदेश असताना सुद्धा संबंधित अधिकारी देत नसल्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे लेंडी प्रकल्पाची निर्मिती गृहमंत्री स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांच्या काळामध्ये झाली असून त्यांनी येथील प्रकल्पग्रस्तांना कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी तसेच चांगल्या दर्जाचे राहण्यासाठी घर व जमिनी संपादित केले आहेत अशांना योग्य मोबदला देण्याचे त्यांनी आदेश दिले होते परंतु अद्यापही इथल्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला व कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली नाही त्या बाबीसाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री पालकमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले आहे
