जनतेज न्युज

फ्रेसेनियस काबी कंपनीच्या विरोधात मनसेचे खळखट्टाक आंदोलन

पुणे-फ्रेसेनियस काबी कंपनीच्या कामगार विरोधी धोरणामुळे मनसे कामगार सेना सरचिटणीस सचिन गोळे यांनी कंपनीच्या पुणे येथील कार्यालयाची तोडफोड
केली आहे.बेकायदेशीररित्या कामगारांना कामावरून कमी करणे,कामगारांना पगार वाढ न करणे,कामगारांवर अन्याय करणे,संघटनेला चर्चेला वेळ न देणे, संघटनेचा नाम फलक लावण्यास विरोध करणे अश्या विविध कारणांमुळे मनसेने खळखट्टाक आंदोलन केले.