जनतेज न्युज

भव्य किसान मोर्चात सहभागी व्हावे खासदार रक्षा खडसेंचे केळी उत्पादकांना आवाहन..

प्रतिनिधी , जळगाव : केळी पिक विमा तसेच केळी पिक उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणीविषयी जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टी,व केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने दि.9 नोव्हें.2020 सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी,केळी पिक विमा संदर्भातील चुकीच्या धोरणाविरोधात ‘भव्य किसान मोर्चा/आंदोलन’केले जाणार आहे,म्हणून या आंदोलनाच्या नियोजन संदर्भा दि.6 नोव्हें.2020 शुक्रवार रोजी प्रदेश चिटणीस तथा खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केळी उत्पादक भागात दौरा प्रसंगी मोर्चात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले .
उत्तर महा.किसान मोर्चा संयोजक सुरेशजी धनके,कृषीभुषण नारायण बापू चौधरी तसेच चोपडा ता.पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अडावद-धानोरा जि.प.गटाच्या धानोरा येथे झालेल्या बैठकीत अडावद,बिडगाव,मोहरद,खर्डी,लोणी,पंचक,मितावली,पुनगाव,पिंप्री,वरगव्हाण,देवगाव,आदि गावातील केळी पिक उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.तसेच लासुर – घोडगांव जि प गटाच्या स्वामी नारायण मंदिर कुसुम्बा येथे बैठक घेण्यात आली त्यावेळी घोडगांव , लासुर , गणपुर , वेळोदे , गलंगी , कुसुम्बा , अजंटीसिम , वढोदा , वाळकी , शेन्दनी , मालखेड़ा , अनवर्दे , दगडी , भवाळे , विटनेर , मोहिदा आदि गावातील केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते तसेच वर्डी – गोरगावले जि प गटाच्या बैठकीत वडगाव , खड़गाव , रुखनखेड़ा , तावसे , घुमावल , कोलंबा , वटार , सुटकार , खेड़ीभोकरी आदि गावातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते