प्रतिनिधी, वर्धा : मागील वीस जून पासून राज्यातील राजकारणात भूकंप आलेला होता. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर 30 जून रोजी अनपेक्षितपणे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ राजभवनात घेतली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेताच आज दिणांक 1 जुलै रोजी वर्धा शहरात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालय धंतोली येथे ढोल ताशांच्या गजरात विजय जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
