जनतेज न्युज

प्लास्टिक मुक्त बाजार करण्याचा नागपूरात शुभारंभ

प्रतिनिधी, नागपूर : केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. या बाबत नागरिक आणि दुकानदारांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने अमर स्वरूप फौंडेशन, पुलक मंच परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त बाजार करण्याचा तसेच बॅनर आणि कापडी पिशवी देण्याचा शुभारंभ नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेला आयुक्त आणि मान्यवरांच्या हस्ते बाजारात असलेल्या दुकानदारांना यावेळेला प्लास्टिक न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आणि कापडी पिशव्या त्यांना देण्यात आल्या.