जनतेज न्युज

भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीज बिलाची होळी ; वीज बिल माफ करण्याची मागणी

प्रतिनिधी , यवतमाळ : लॉक डाउनमुळे जनता त्रस्त झालेली आहे. त्यातच ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठविण्यात आले आहे. ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात आली.
सुरुवातीच्या काळातील नागरिकांचा रोष बघता वीज बिल माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र आता
ऊर्जा मंत्री वीज बिल माफ करण्याऐवजी वसुलीवर भर देत आहे. वीज ग्राहकांचा विश्वासघात सरकारने केला आहे. नागरिकांचे बिल माफ करण्यात यावे, अन्यथा भाजप यापुढे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला.