जनतेज न्युज

डोंबिवली एक्साईज विभागाची धडक कारवाई….. लाखांच्या विदेशी दारुसह वाहने जप्त ,एक आरोपी गजाआड …..

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : राज्य उत्पादन विभागाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाने धडक कारवाई करत गोवा राज्यातील निर्मित क्लासिको मेल्ट व्हिस्की 17 हजार 760 क्वांटरच्या बाटल्या जप्त करत टेम्पो,ट्रक सह 28 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल सह एका आरोपीला अटक केली आहे. दरम्यान विदेशी मद्य दारूची तस्करी करणारा म्होरक्या फरार झाला असून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत.
व्हीओ : राज्य उत्पादन विभागाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाला कल्याण शीळ रस्त्यावरून अवैधरित्या विदेशी मद्याची तस्करी केली जात असल्याची माहिती खबर्या कडून मिळाली होती. शनिवारी रात्री 1 च्या सुमार कल्याण शील रोड आर्या लॉजच्या समोर एक टेम्पो संशयित रित्या आढळून आल्याने राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने तत्काळ टेम्पो थांबवून झडती घेतली असता टेम्पो मध्ये विदेशी दारूचा साठा आढळला .राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने तत्काळ 1 लाख 80 हजारांच्या दारुसह टेम्पो जप्त केला असून आरोपी दीपक तेजराव बोरडे याला अटक केली त्याच्या चौकशी दरम्यान त्याने दिलेल्या माहिती नुसार उसरघर येथे देखील एका ट्रक वर धाड टाकत 18 लाखांच्या विदेशी मद्यासह ट्रक जप्त केला या अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याचे डोंबिवली विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी दीली.