जनतेज न्युज

बाधितांचे पुनवर्सनाबाबत पालिकेने धोरण ठरवावे – मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

बाधितांच्या पुनर्वसनाच्या विषयी पालिका आयुक्तांची घेतली भेट

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली ला जोडणाऱ्या 90 फिट रोडमधील 13 विस्थापिताचे चार वर्षे उलटून देखील पुनर्वसन न झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांची विस्थापितांनी भेट घेतली होती .या विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नी मनसे आमदार राजू पाटील यांनी आज पालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळी राजू पाटील यांनी 90 फूट रस्त्याच्या काही भागाचे रखडलेले काम आणि या कामादरम्यान तसेच रिंगरुटच्या कामादरम्यान विस्थापित झालेल्याचे पुनर्वसन याबाबत आयुक्तांशी चर्चा केली .आमदार राजू पाटील यांनी बाधितांचे पुनवर्सनाबाबत पालिकेने धोरण ठरवावे जेणेकरून भविष्यात रस्ता द्यायला कुणी नाही बोलणार नाही अशी मागणी केली .याबाबत सदर नवीन रस्त्याचे काम सुरू होणार असून विस्थापितांच्या प्रश्नी 27 तारखेला पुनर्वसन समितीची बैठक असल्याचे सांगितले आमदार पाटील यांनी तुम्ही प्रशासक आहात काही निर्णय रेटून नेऊ शकता आचार संहिता लागण्याआधी पुनर्वसनबाबत निर्णय घ्या अशी मागणी केली यावेळी पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार पाटील यांनी संगीतले