जनतेज न्युज

भारत सरकार तर्फे संरक्षण क्षमता महोत्सव चे आयोजन…

प्रतिनिधी ,नंदुरबार : सक्षम -२०२१ संरक्षण क्षमता महोत्सव हा एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम असून जो आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा , शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केला आहे .या संबधिची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.यावेळी विक्रीकर निरीक्षक ओमकार गरगटे, राज जोशी ,आणि अमित राणा उपस्थित होते …
जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे , परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य आहे . पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना ,पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयक यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्या संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने महाराष्ट्रात विविध उपक्रम राबविले जात आहेत . पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना , पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाचे जनजागृती करण्यासाठी , इंधन कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनाचे धोरण आणि रणनीतीचा प्रस्ताव ठेऊन , सरकारला मदत करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचा यावेळी सांगण्यात आले .१६ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील तेल उद्योगाने १६ जानेवारी २०२१ रोजी या कार्यक्रमाची सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल श्री . भगतसिंग कोश्यारीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन उद्घाटन केले आहे .