जनतेज न्युज

मंत्री यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

प्रतिनिधी , अमरावती : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाकरिता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील मोझरी या आपल्या गावामध्ये दुपारी १२ वाजता मतदानाचा सहकुटुंब अधिकार बजावला, स्वतः रांगेत लागून त्यांनी मतदान केले आहे तर त्यांनी यावेळी मतदारांशी संवाद देखील साधला,.यावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी मतदारांना केले ..यशोमती ठाकूर यांच्या गावात त्यांच्या काँग्रेस पक्षाची गेल्या 10 वर्षांपासून सत्ता आहे