जनतेज न्युज

मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांच्या हस्ते 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

प्रतिनिधी, औरंगाबाद : मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांच्या हस्ते शहरातील मयुरबन कॉलनीतील प्रियदर्शनी विद्यालय येथे 12 ते 14 वर्षाच्या लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेला आज पासून सुरुवात करण्यात आली,

 असून मनपा आयुक्त यांच्या हस्ते सदरील मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.असून सदरील शाळेला डी मार्ट च्या सीएसआर फंडातून प्राप्त झालेल्या रकमेतून कॉम्पुटर लॅब ग्रंथालय आणि स्कोडा यांच्या सीएसआर फंडातून प्राप्त झालेल्या सायन्स लॅब चे उद्घाटन ही मनपा आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले असून  यावेळी विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कोरोना संकटाला हद्दपार करण्यासाठी 100% लसीकरण करणे गरजेचे असून, शहरात विविध ठिकाणी मनपाच्या आरोग्य केंद्रात लसीकरण कॅम्प सुरू असून नागरिकांनी आपल्या कुटुंबाचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केले.